Pages

SCROLLING TEXT

!! WELCOME !! “ज्ञानज्योत” ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत..!!

PF माहिती

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.
Ø कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
Ø कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme)
या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यास त्याचे या योजनेमध्ये झालेल्या संचित ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात बदल होऊ शकतो. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्था यावर देखरेख ठेवते. कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.
EPF खात्यात किती रक्कम जमा आहे? हे आपण ऑनलाइन पाहू शकता.
आता पीएफ खातेधारकास आपल्या खात्यामध्ये किती रक्कम जमा आहे हे पाहण्यासाठी वर्षाअखेरीस मिळणा-या स्लिपची वाट पाहण्याची गरज नाही. आपण आपल्या घरुन किंवा ऑफीसमधून आपल्या खात्यातील जमा रक्कम चेक करु शकता.
ते कसे? तर त्यासाठी एसएमएस, मिस्ड कॉल किंवा एपीएफओ (APFO) च्या वेबसाइटवर आपला बॅलन्स पाहू शकता.
१)  एपीएफओ (APFO) च्या वेबसाइटवर PF पासबुक पाहण्यासाठी आपला PF  खाते नंबर (UAN)  शी जोडलेला असला पाहिजे.
२) खातेधारकाचे पासबुक पाहण्याची सुविधा www.epfindia.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
३) वेबसाइट ओपन झाल्यानंतर सर्व्हिसेस (Services) टॅबमधून फॉर एम्प्लॅाइ (For Employees) या टॅबवर क्लिक करा.
४) Services हेडच्या खाली असलेल्या (Member Passbook) मेंबर पासबुक वर क्लिक करा.
५) नंतर जे पेज ओपन होइल त्या पेजवर Sign in करण्यासाठी UAN/ Universal Account No. व पासवर्ड टाकून लॉग इन करा  

·         Important

  • 1. This facility is to view the Member Passbook for the members registered on the Unified Member Portal.
  • 2. Passbook will be available after 6 Hours of registration at Unified Member Portal.
  • 3. Changes in the credentials at Unified Member Portal will be effective at this Portal after after 6 Hours.
  • 4. Passbook will have the entries which has been reconciled at the EPFO field offices.
  • 5. Passbook facility not be available for the Exempted Establishments Members / Settled Members / InOperative Members.

६) EPF चे पासबुक पाहण्यासाठी आपला खाते नंबर (UAN) ॲक्टिव्हेट असला पाहिजे. 'ईपीएफओ' ऑनलाईन सेवेचा भाग असलेली ही सुविधा ज्या नागरिकांनी आपलं 'युनिव्हर्सल अकाऊंट' ॲक्टिव्हेट केला असेल त्यांनाच प्राप्त होईल. 
७)  जर आपण आपला खाते नंबर या सुविधेशी ॲक्टिव्हेट केला असेल तर लॉग इन नंतर  ६ तासामध्ये आपणास आपले पासबुक अव्हेलेबल होईल.
SMS च्या आधारे पीएफ बॅलन्स कसा चेक करावा?
जर आपला UAN ईपीएफओ कडे रजिस्टर असेल तरच एसएमएस च्या आधारे आपण आपला बॅलन्स चेक करु शकता, त्यासाठी आपणास 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल.
मेसेज कसा कराव?
EPFOHO UAN ENG. असा मेसेज केल्यास माहिती इंग्रजीमध्ये येईल. भाषा निवडण्यासाठी शेवटची तीन अक्षरे आहेत. मराठीमध्ये माहिती हवी असल्यास EPFOHO UAN MAR. असा मेसेज पाठवल्यास माहिती मराठीमध्ये मिळेल.
परंतू त्यासाठी UAN खाते नंबर पॅन नंबर व आधार नंबरशी लिंक असले पाहिजे.
कागदपत्रांशिवाय पी.एफ. मधून पैसे काढता येणार.
भारत सरकारने कोरोनाच्या संकट काळात ईपीएफ खातेधारकांना आपल्या पी.एफ. खात्यामधून तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सरकारनं हा नोकरदारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. एखादया कर्मचा-याने भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज केल्यास त्याला कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ईपीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येतो.
EPF ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची सुवीधा आहे. (UAN) Universal Account Number आल्यापासून कर्मचा-याची सर्व खाती एकाच ठिकाणी असतात, परंतू जर पैसे वेगवेगळया खात्यात शिल्लक असतील तर प्रथम आपल्या UAN नंबर नवीन कंपनीशी  शेअर करावा लागतो. नंतर जुन्या खात्यातून नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. यासाठी खालील माहिती पहा.
PF हस्तांतरणासाठी अर्ज कसा करावा?
१) सर्वात प्रथम EPFO https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ memberinterface/ या पोर्टलवर जा. (UAN) Universal Account Number व पासवर्ड टाकून लॉग इन करा.
२)  नंतर ऑनलाइन सेवांवर जा आणि मेंबरवर ईपीएफ खाते हस्तांतरण विनंती पर्यायावर क्लिक करा.
३)   त्यानंतर आपण आपली वैयक्तिक माहिती आणि पीएफ खात्याची पडताळणी  करा.
४)   नंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. आपणास मागील नियुक्तिचा पीएफ खात्याचा तपशील दिसेल.
५   आता ऑनलाइन क्लेम फॉर्मची खात्री करण्यासाठी आधिचा नियोक्ता आणि  सद्याचा नियोक्ता यांच्यामध्ये निवड करण्याचा पर्याय असेल. दोन  नियोक्तांपैकी  एकाची निवड करा, सभासद आयडी किंवा यूएएन द्या.
६)    शेवटी गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
७)   आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाका आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
८)  ओटीपी पडताळणी झाल्यानंतर ऑनलाइन मनी ट्रांन्सफर प्रक्रियेची विनंती अगोदरच्या कंपनीला पाठविली जाईल.
९)  ही प्रक्रिया तीन दिवसात पूर्ण होईल. प्रथम कंपनी ते हस्तांतरित करेल व इपीएफओचे फिल्ड अधिकारी याची पडताळणी करतील.
१०)  पडताळणीनंतरच तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरीत होतील.



No comments:

Post a Comment

इयत्ता ५ वी ते १० वी सर्व विषयांचा अभ्यास

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu