प्रेरणादायी सुविचार
1)
अंतर्बाह्य
प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
|
2)
अंथरूण
बघून पाय पसरा.
|
3)
अंहकार
हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
|
4)
अतिथी
देवो भव॥
|
5)
अतिशहाणा
त्याचा बैल रिकामा.
|
6)
अती
अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
|
7)
अत्तर
सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
|
8)
अनुभवासारखा
दुसरा गुरू नाही.
|
9)
अन्याय
आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
|
10)
अन्याय
करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप!
|
11)
अपयशाने
खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
|
12)
अश्रु
येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
|
13)
अश्रुंनीच
ह्र्दये कळतात आणि जुळतात.
|
14)
अहंकार
विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
|
15)
आकाशाखाली
झोपणाऱ्याला कोण लुटणार?
|
16)
आज
मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
|
17)
आदर्श
गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
|
18)
आधी
विचार करा, मग कृती करा.
|
19)
आनंदी
मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत
मिळणं.
|
20)
आपण
एखाद्यास दर्शविण्यासाठी अभ्यास करत असल्यास आपण स्वत: ला फसवित आहात.
|
21)
आपण
कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
|
22)
आपण
काही नवीन करत नसल्यास आपण यश प्राप्त करू शकत नाही.
|
23)
आपण
चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र!
|
24)
आपण
जे पेरतो तेच उगवतं.
|
25)
आपण
परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
|
26)
आपण
हार मानत नाही तोपर्यंत आपला पराभव होणार नाही.
|
27)
आपलं
जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
|
28)
आपला
जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण
हसत असू आणि लोक रडत असतील!
|
29)
आपले
सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
|
30)
आपल्या
दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
|
31)
आपल्या
पाठीमागे बोलनाऱ्याकडे लक्ष देऊ नका, याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्यापेक्षा
दोन पाऊल पुढे आहात
|
32)
आपल्यामुळे
दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
|
33)
आपल्याला
जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम
करा.
|
34)
आपल्याला
पडण्याची भीती असल्यास आपण कधीही उभे राहू शकणार नाही.
|
35)
आपल्याला
मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
|
36)
आयुष्य
जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
|
37)
आयुष्य
जगून समजते; केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.
|
38)
आयुष्यात
आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
|
39)
आयुष्याच्या
प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
|
40)
आयुष्यात
असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
|
41)
आयुष्यात
काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
|
42)
आयुष्यात
कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
|
43)
आयुष्यात
खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
|
44)
आयुष्यात
खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय
हरूनदेखील जिंकलेलं असतं.
|
45)
आयुष्यात
पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
|
46)
आयुष्यात
प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
|
47)
आयुष्यात
भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
|
48)
आयुष्यात
भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
|
49)
आयुष्यात
सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
|
50)
आयुष्यात
सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
|
51)
आयुष्यातला
खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
|
52)
आयुष्यातल्या
कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
|
53)
आवडतं
तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
|
54)
आव्हाने
हीच जीवन रुचीपूर्ण बनवतात. त्यांच्यावर मात करणे म्हणजेच जीवनाला अर्थपूर्ण
बनवते.
|
55)
इतरांप्रमाणेच
आपणही अद्वितीय आहात हे नेहमी लक्षात ठेवा.
|
56)
उगवणारा
प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
|
57)
उद्याचं
काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
|
58)
उद्याचा
भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
|
59)
उशीरा
दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
|
60)
उषःकाल
कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
|
61)
उषःकालाकडे
जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
|
62)
ऎकावे
जनाचे करावे मनाचे.
|
63)
एक
साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
|
64)
एकदा
तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
|
65)
एकमेका
साहय्य करू। अवघे धरू सुपंथ॥
|
66)
एकमेकांची
प्रगती साधते ती खरी मैत्री.
|
67)
एका
वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
|
68)
एकांतात
मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन
व्यक़्त होतो.
|
69)
एखाद्याला
गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
|
70)
ओरडण्याने
ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
|
71)
कठोर
परिश्रम केल्याशिवाय टॅलेंट काहीच कामाचे नाही.
|
72)
कठोर
परिश्रमाला पर्याय नाही.
|
73)
कडू
घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
|
74)
कधी
कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
|
75)
कधी
कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
|
76)
कधीकधी
डोळे देखील फसवले जातात, म्हणून नेहमी आपले डोळे आणि कान खुले ठेवा.
|
77)
कधीकधी
दुसर्या संधी नसतात, वेळ नसते, पुढली वेळ नसते, तेव्हा फक्त आता किंवा कधीच
नसते!
|
78)
कम्फर्ट
झोनमधून बाहेर पडा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता.
|
79)
कर्तव्य
पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
|
80)
कलेशिवाय
जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर!
|
81)
कविता
म्हणजे भावनांचं चित्र!
|
82)
काट्याविना
गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
|
83)
कामात
आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
|
84)
काळजाची
प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
|
85)
काळ्याकुट्ट
रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
|
86)
काळ्याकुट्ट
रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
|
87)
कुठल्याही
कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
|
88)
कुणीही
चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
|
89)
कृतघ्नतेसारखे
दुसरे पाप नाही.
|
90)
केल्याने
होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
|
91)
केवड्याला
फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
|
92)
केवळ
ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
|
93)
केवळ
ज्या व्यक्तीला ध्येय व्यतिरिक्त काही दिसत नाही तोच आपले ध्येय साध्य करू शकतो.
|
94)
कोणतेही
कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.
|
95)
कोणाचा
विश्वास कधीही तोडू नका, कारण एकदा तो मोडला की, तो पुन्हा जोडला जाणार नाही.
|
96)
क्रांती
तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
|
97)
क्रांती
हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
|
98)
क्रोध
माणसाला पशू बनवतो.
|
99)
खरं
आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि
डोळ्यांनी पाहतो ते खरं.
|
100)
खरी
श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
|
101)
खऱ्या
विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची
संधी असते.
|
102)
खिडकी
म्हणजे आकाश नसतं.
|
103)
खूप
माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
|
104)
खोटी
टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
|
105)
गरिबी
असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
|
106)
गरूडाइतके
उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
|
107)
गर्वाचं
घर नेहमीच खाली असतं.
|
108)
गवताची
दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
|
109)
गुणांचं
कौतुक उशीरा होतं; पण होतं !
|
110)
चांगला
माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
|
111)
चांगली
कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
|
112)
चांगले
काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
|
113)
चारित्र्याचा
विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
|
114)
चिंता
ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
|
115)
चुकण
हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
|
116)
चुकतो
तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!
|
117)
चुकीचा
व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
|
118)
चेहरा
हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
|
119)
छंद
आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
|
120)
जखम
करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
|
121)
जग
प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
|
122)
जग
बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
|
123)
जग
भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
|
124)
जग
हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
|
125)
जगण्यात
मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे.
|
126)
जगात
सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
|
127)
जगाशी
प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
|
128)
जगी
सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
|
129)
जगू
शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
|
130)
जर
तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला अशी कामे करावी लागतील जी इतर
लोक करायला तयार नाहीत.
|
131)
जर
तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही
आरशात पाहा…!
|
132)
जर
तुम्ही वेळेसोबत जात नाही आहात तर आपण लोखंडासारखे गंजताल.
|
133)
जर
वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
|
134)
जरूरीपेक्षा
अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
|
135)
जीवन
जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
|
136)
जीवन
नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
|
137)
जीवन
हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
|
138)
जीवन
ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
|
139)
जीवनात
चांगल्या मानसांना शोधू नका, स्वत: चांगले व्हा म्हणजे कोणीतरी तुम्हाला शोधत
येईल.
|
140)
जीवनात
तेच व्यक्ती अपयशी होतात जे विचार खूप करतात पण कृती करत नाही.
|
141)
जीवनात
सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय.
|
142)
जीवनातील
प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
|
143)
जूनी
खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
|
144)
जे
आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम
करणं हेच खरं प्रेम!
|
145)
जे
आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
|
146)
जे
घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
|
147)
जे
झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
|
148)
जे
दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क
नही.
|
149)
जे
नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
|
150)
जे
स्वतःसाठी जगतात ते मरतात, जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात.
|
151)
जो
गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
|
152)
जो
गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
|
153)
जो
चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
|
154)
जो
त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
|
155)
जो
दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
|
156)
जो
धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
|
157)
जो
मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु जो स्वतःच्या मनातुन हार मानतो तो
माणूस कधीही जिंकू शकत नाही !!
|
158)
जो
स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
|
159)
ज्या
गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
|
160)
ज्या
गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
|
161)
ज्या
चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला
नाही.
|
162)
ज्या
व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला
नाही.
|
163)
ज्यांच्याकडून
आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!
|
164)
ज्याच्याजवळ
उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
|
165)
ज्याच्यामधे
मानवता आहे तोच खरा मानव!
|
166)
ज्यादिवशी
आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
|
167)
ज्याने
स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
|
168)
झाडावर
प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
|
169)
टाकीचे
घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
|
170)
टीका
करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
|
171)
तडजोड
हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
|
172)
तन्मयता
नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
|
173)
तलवारीच्या
जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
|
174)
तारूण्य
म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
|
175)
तिरस्कार
पापाचा करा; पापी माणसाचा नको.
|
176)
तुमची
उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
|
177)
तुमचे
विजय तुमच्या डोक्यावर जाऊ देऊ नका किंवा तुमच्या अपयशा तुमच्या मनात येऊ नयेत.
|
178)
तुम्हाला
जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
|
179)
तुम्हाला
ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या
विषयी मौन पाळा.
|
180)
तुम्हाला
मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
|
181)
तुम्हाला
सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
|
182)
तुम्ही
आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
|
183)
तुम्ही
किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
|
184)
तुम्ही
जसे विचार करता तशीच कृती करत असतात
|
185)
तुम्ही
जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
|
186)
तुम्ही
जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला
देईल.
|
187)
तुम्ही
पाण्यात पडून बुडत नाही; तुम्ही तिथे राहून बुडतात.
|
188)
तुलना
करावी पण अवहेलना करू नये.
|
189)
तूच
आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
|
190)
त्याज्य
वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
|
191)
त्रासाशिवाय
विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
|
192)
दु:ख
कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
|
193)
दुःख
गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
|
194)
दुःख
हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
|
195)
दुःख
हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
|
196)
दुःखातील
दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
|
197)
दुबळी
माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
|
198)
दुर्जन
मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे
त्याहून बरे.
|
199)
दुसऱ्यांच्या
गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
|
200)
दुसऱ्याचे
अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
|
201)
दुसऱ्याला
सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
|
202)
देणाऱ्याने
देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
|
203)
दोष
लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
|
204)
न
मागता देतो तोच खरा दानी.
|
205)
नवं
काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
|
206)
निघून
गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
|
207)
नेहमी
एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते.
|
208)
नेहमी
तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
|
209)
नेहमी
तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो
त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
|
210)
नैतिक
पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
|
211)
परमेश्वर
ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
|
212)
परमेश्वराच्या
आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
|
213)
परिस्थितिला
शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
|
214)
परीक्षा
जे पात्र आहे त्यांच्यासाठी आहे.
|
215)
परीक्षा
म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!
|
216)
पाप
इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला
कवटाळतो.
|
217)
पाप
ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
|
218)
पिंजऱ्यात
कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
|
219)
पुढचा
आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
|
220)
पुढे
मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
|
221)
पुस्तकांसारखा
दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
|
222)
पुस्तकाइतका
प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
|
223)
पोहरा
झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
|
224)
प्रतिकूलतेतही
अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
|
225)
प्रत्येक
क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
|
226)
प्रत्येक
बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
|
227)
प्रत्येकाच्या
मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
|
228)
प्रसंगी
थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
|
229)
प्राप्तीपेक्षा
प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
|
230)
प्रायश्चित्तासारखी
दूसरी शिक्षा नाही.
|
231)
प्रार्थना
म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
|
232)
प्रार्थना
म्हणजे मनाचं स्थान
|
233)
प्रेम
सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
|
234)
प्रेमाला
आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
|
235)
फळाची
अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
|
236)
बचत
म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
|
237)
बदलण्याची
संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
|
238)
बनू
शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
|
239)
बाह्यशत्रूपेक्षा
बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
|
240)
बाह्यसौंदर्यापेक्षा
अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
|
241)
बोलावे
की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
|
242)
बोलून
विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
|
243)
भरणाऱ्या
जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
|
244)
भरलेला
खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
|
245)
भव्य
विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
|
246)
भाकरी
आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
|
247)
भितीयुक्त
श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
|
248)
भुतकाळ
आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
|
249)
भूतकळा
पसून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे
स्वतःला प्रश्न करणे थांबु नका.
|
250)
मनाची
श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
|
251)
मनाचे
दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
|
252)
मनात
आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
|
253)
मनाला
आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
|
254)
मनाला
आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
|
255)
मनाविरूध्द
गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
|
256)
मनुष्या
जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
|
257)
मरण
हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
|
258)
मरावे
परी कीर्तीरूपे उरावे.
|
259)
माणसाचा
सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी.
|
260)
माणसाची
चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
|
261)
माणसाने
माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
|
262)
माणूस
म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
|
263)
मित्र
परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
|
264)
मित्राच्या
मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
|
265)
मुक्या
प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
|
266)
मूर्ख
माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
|
267)
मूर्खांना
विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
|
268)
मोती
होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
|
269)
मोहाचा
पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
|
270)
यश
न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
|
271)
यश
मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
|
272)
यश
मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
|
273)
यश
साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे.
|
274)
यश
हे दिवस आणि दिवस वारंवार वारंवार पुनरावृत्ती होणार्या अनेक लहान प्रयत्नांची
बेरीज आहे.
|
275)
यशाचा
कोणताही मंत्र नाही, तो फक्त परिश्रम करण्याचा परिणाम आहे.
|
276)
यशाचा
रस्ता प्रामाणिकपणाच्या मार्गावरुन जातो.
|
277)
या
जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
|
278)
रागाला
जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
|
279)
रामप्रहरी
जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
|
280)
राष्ट्र
निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
|
281)
लक्षात
ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
|
282)
लखलखते
तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
|
283)
लज्जा
हा सौंदर्याचा अलंकार आहे.
|
284)
लीनता
आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
|
285)
वाईट
गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
|
286)
वाचन,
मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
|
287)
वात
कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
|
288)
वाहतो
तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!!
|
289)
विचार
करण्यात आपला वेळ वाया घालवू नका, आत्ता आपले काम सुरू करा.
|
290)
विचारवंत
होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
|
291)
विजेते
वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
|
292)
विद्या
विनयेन शोभते ॥
|
293)
वेळ
खूप वेगाने जात आहे, जे करायचे ते आता पूर्ण करावे लागेल.
|
294)
वेळ
राजाला रंक बनवू शकतो, तर रंकला राजा बनवू शकतो.
|
295)
वेळेचा
अपव्यय तुम्हाला विनाशाकडे नेतो.
|
296)
वैभव
त्यागात असते, संचयात नाही.
|
297)
व्यर्थ
गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
|
298)
व्यायामामुळे
बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
|
299)
शक्तीचा
उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
|
300)
शत्रूने
केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
|
301)
शत्रूशीही
प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
|
302)
शरीरमाध्यम
खलु सर्वसाधनम ॥
|
303)
शरीराला
आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
|
304)
शरीराला
श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
|
305)
शहाणपणाचे
प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
|
306)
शिकणाऱ्याला
शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
|
307)
शिक्षक
केवळ यशाचा मार्ग दर्शवू शकतो, परंतु आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.
|
308)
शिक्षक
म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
|
309)
शिक्षण
हे साधन आहे; साध्य नव्हे.
|
310)
शिक्षण
हेच परिवर्तनाचे साधन आहे
|
311)
शीलाशिवाय
विद्या फ़ुकाची आहे.
|
312)
श्रध्दा
असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
|
313)
श्रीमंताचे
बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
|
314)
संकटं
टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
|
315)
संकटं
तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
|
316)
संघर्ष
हे जीवनाचे आणखी एक नाव आहे.
|
317)
संभवनीय
गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
|
318)
संभ्रमाच्या
वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
|
319)
संयम
राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
|
320)
सगळेच
निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
|
321)
सत्याने
मिळतं तेच टिकतं.
|
322)
सत्याला
शपथांच्या टेकूची गरज नसते.
|
323)
सदगुणांना
कधीच वार्धक्य येत नाही.
|
324)
सन्मित्र
शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
|
325)
समजवण्यापेक्षा
समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी
|
326)
समाधानी
राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
|
327)
समुद्रात
कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
|
328)
सर्वच
प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
|
329)
सहल
म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
|
330)
सामर्थ्याच्या
पाठीमागे शील हवे.
|
331)
सुख
हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
|
332)
सुरुशब्दांपेक्षा
शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
|
333)
सृजनातला
आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
|
334)
सौंदर्य
हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
|
335)
स्वत:च्या
स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
|
336)
स्वतः
चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
|
337)
स्वतः
जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
|
338)
स्वतःचा
अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
|
339)
स्वतःची
चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
|
340)
स्वतःला
पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
|
341)
स्वधर्माविषयी
प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
|
342)
स्वप्न
आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
|
343)
स्वप्ने
ते नसतात जे झोपेत पडतात , स्वप्ने अशी असतात जे आपल्याला झोपू देत
नाहीत.
|
344)
स्वभावातील
गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात
|
345)
स्वातंत्र्य
म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
|
346)
स्वातंत्र्य
हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य
आहे.
|
347)
स्वातंत्र्याचे
मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
|
348)
स्वार्थरहीत
आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
|
349)
हक्क
आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
|
350)
हसा,
खेळा पण शिस्त पाळा.
|
351)
हाव
सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
|
352)
हिंसा
हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची!
|
353)
हे
देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
|
354)
ह्रदयात
अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र.
|
355)
ह्रदये
परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
|
No comments:
Post a Comment